सेंट्रल हिंदू मिलिटरी एज्युकेशन संचालित शिशुविहार व बालक मंदिर शाळेमध्ये 'क्रांती दिन' साजरा.
दिनांक 10 ऑगस्ट रोजी शाळेमध्ये क्रांती दिन उत्साहाने साजरा करण्यात आला. आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी आपले सर्वस्व अर्पण करणाऱ्या सर्व क्रांतिकारकांना अभिवादन करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली. सुवर्णदुर्ग वर्गाने उत्तमरीत्या क्रांती दिनाचे सादरीकरण केले. भगतसिंग, सुखदेव, राजगुरू या क्रांतिकारकांनी देशासाठी केलेल्या अमूल्य बलिदानाचे महत्त्व 'रंग दे बसंती चोला' या गाण्यातून विद्यार्थ्यांनी सादर केले. याद्वारे सर्व विद्यार्थ्यांच्या मनामध्ये आपल्या देशासाठी बलिदान केलेल्या क्रांतिकारकांविषयी आणि त्यांनी केलेल्या महत्त्वपूर्ण कार्याची माहिती झाली. त्यानंतर सर्वांच्या मनामध्ये क्रांतीची ज्योत पेटवणारे आणि मनामध्ये विश्वास निर्माण करणारे समूहगीत 'हम होंगे कामयाब...' विद्यार्थ्यांनी जोशात सादर केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन विद्यार्थ्यांनीच केले. कार्यक्रमास मार्गदर्शन शाळेच्या मुख्याध्यापिका माननीय सौ नीता पाटील बाई आणि शालेय समिती अध्यक्ष माननीय दाबक बाई यांचे लाभले.