सेंट्रल हिंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटी संचालित शिशु विहार व बालक मंदिर १ली ते ४थी शाळेत शिक्षक पालक संघातर्फे गणपती निमित्त विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. इयत्ता पहिली साठी गणपती स्तोत्र पाठांतर स्पर्धा घेण्यात आली.
इयत्ता दुसरी साठी विविध वस्तू पासून गणपती बनविणेव चौथी साठी पुष्परचना या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले .
तिसरी साठी गणपतीची विविध गाणी पाठांतर स्पर्धा घेण्यात आली.
तसेच माता पालकांसाठी ठिपक्यांची रांगोळी काढणे या स्पर्धेचे आयोजन केले .
वरील स्पर्धेत विद्यार्थ्यां बरोबरच पालकांनी उत्साहाने सहभाग घेतला.
वरील कार्यक्रमासाठी मार्गदर्शक शालेय समिती अध्यक्षा सौ .सुवर्णा दाबक मॅडम व शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.नीतापाटील मॅडम यांचे लाभले.