दीप अमावस्या

18 Sep 2024 08:15:22
दीप अमावस्या
दीप अंधाराकडून प्रकाशाकडे, अज्ञाताकडून ज्ञाताकडे जाण्याचा मुख्य मार्ग आहे .या दिव्यांचे महत्त्व विद्यार्थ्यांना समजावे ,आपले जीवन दिव्याप्रमाणे प्रकाशमान व्हावे आणि दिव्याप्रमाणे सर्वांना तेजोमय जीवन लाभावे आपल्या आयुष्यातील दिव्याचे अगणिक स्थान विद्यार्थ्यांना कळावे हा हेतू साधत
सेंट्रल हिंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटी संचालित शिशुविहार व बालक मंदिर इयत्ता १ली ते ४थी शाळेत दिनांक३/८/२०२४ शनिवार रोजी दीप अमावस्या साजरी करण्यात आली. यावेळी कार्यक्रमाची सुरुवात शाळेच्या मुख्याध्यापिका यांनी दीपप्रज्वलन करून करण्यात आली .सर्व विद्यार्थ्यांनी दिव्याचा श्लोक म्हटला.

विविध दिव्यांची प्रदर्शन मांडण्यात आले. विद्यार्थ्यांना दीप अमावस्या आपण का साजरी करतो , दिव्यांचे उपयोग,महत्व पारंपारिक दिवे, आधुनिक दिवे याविषयी माहिती विद्यार्थ्यांना सांगण्यात आली.श्लोक तसेच विद्यार्थ्यांकडून प्रार्थना म्हणून घेण्यात आली. सर्व विद्यार्थ्यांना विविध प्रकारचे दिव्यांची प्रदर्शन दाखविण्यात आले.
कार्यक्रमासाठी मार्गदर्शन शालेय समिती अध्यक्षा सुवर्णा दाबक मॅडम व शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.नीता पाटील मॅडम यांचे लाभले.

दीप अमावस्या 
Powered By Sangraha 9.0