वैदिक वाढदिवस

शिशुविहार व बालक मंदिर 1-4    16-Sep-2023
Total Views |

 

 
 
वैदिक वाढदिवस
 
 
 
 
 
 
वैदिक  वाढदिवस साजरा

सेंट्रल हिंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटी संचालित शिशु विहार व बालक मंदिर मराठी माध्यम पहिली ते चौथी शाळेत शनिवार दिनांक 22/7/2023 रोजी वैदिक पद्धतीने वाढदिवस साजरा करण्यात आला. यावेळी शाळेतील जून ,जुलै या महिन्यात ज्या विद्यार्थ्यांचे वाढदिवस असतात त्यांचे वाढदिवस वैदिक पद्धतीने साजरे करण्यात आले कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन करून

करण्यात आली. यावेळी पंचमहाभूतांची माहिती विद्यार्थ्यांना सांगण्यात आली. नंतर गणपती, सरस्वती, गुरूंचा श्लोक विद्यार्थ्यांकडून म्हणून घेतला. दिवा विझविणे आपल्या संस्कृतीत अशुभ मानले जाते म्हणून मेणबत्तीला फुंकर न मारता करून वाढदिवस साजरा केला. वाढदिवस असणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांच्या माता पालकांनी औक्षण केले तसेच सर्व पालकांना मुलांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने संकल्प करण्यास सांगण्यात आले.

चैतन्यमय वातावरणात विद्यार्थ्यांचे वाढदिवस वैदिक पद्धतीने साजरे करण्यात आले.

कार्यक्रमासाठी मार्गदर्शन शालेय समिती अध्यक्षा सौ. सुवर्णा दाबक मॅडम व शाळेचे मुख्याध्यापिका सौ.नीता पाटील मॅडम यांचे लाभले.