शिशुविहार मध्ये भरले गणिती साहित्याचे प्रदर्शन
गणित दिनानिमित्त शिशुविहार व बालक मंदिर मधील विद्यार्थ्यांनी विविध प्रकारचे साहित्य तयार करून प्रदर्शन भरविले. प्रदर्शनाचे उद्घाटन शालेय समिती सदस्या सौ शोभा कोठावदे यांनी केले. गणित विषयाची आवड निर्माण व्हावी तसेच गणितीय संकल्पना सोप्या पद्धतीने समजाव्या हा प्रदर्शनाचा मुख्य हेतू होता.