सवंगडी संस्था नाशिक आयोजित १ली जिल्हास्तरीय क्रीडा विषयक पथनाट्य या स्पर्धेत शिशु विहार व बालक मंदिर मराठी माध्यम ( १ ली ते ४ थी) शाळेतील विद्यार्थ्यांचा प्रथम क्रमांक आला तसेच निरांत सोनवणे या विद्यार्थ्याची चित्रपटात निवड झाली. विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्र व सन्मानचिन्ह मिळाले.
पथनाट्याचे लेखन ज्योती रत्नपारखी, दिग्दर्शन स्वाती देवरे व सपना कासार यांनी केले. मार्गदर्शन शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. मानसी बापट यांनी केले.