विजय कारगिल दिन

विजय कारगिल दिन

शिशुविहार व बालक मंदिर 1-4    18-Sep-2024
Total Views |
पनी जान देकर
तिरंगे की शान रखी थी
हातो मे बंदूक उठाकर
भारत माँ की रक्षा कि थी
अशा विजय कारगिल दिनाचे औचित्य साधत सेंट्रल हिंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटी संचालित शिशु विहार व बालक मंदिर मराठी माध्यम १ली ते ४थी शाळेत विजय कारगिल दिन अतिशय उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी भारत मातेच्या प्रतिमेचे पूजन शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.नीता पाटील बाई यांनी केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संहिता बापट आणि गिरीजा मोगरे या विद्यार्थिनींनी केले.
विजय कारगिल दिनाचे महत्त्व, सैनिकांनी केलेल्या बलिदानाचे, त्यागाची माहिती विद्यार्थ्यांना सांगण्यात आली. देशभक्तीपर गीतावर इयत्ता दुसरीतील विद्यार्थ्यांनी नृत्य सादर केले .शहीद जवानांना मानवंदना देऊन त्यांनी केलेल्या बलिदानाप्रती आदरांजली अर्पण करण्यात आली .
कार्यक्रमासाठी मार्गदर्शन शाळेच्या अध्यक्षा सौ. सुवर्णा दाबक मॅडम व शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.नीता पाटील मॅडम यांचे लाभले.
 


विजय कारगिल दिन