मुख्याध्यापकांचे मनोगत

शिशुविहार व बालक मंदिर 1-4    09-Sep-2023
Total Views |

 मुख्याध्यापकांचे मनोगत


मा.सौ.नीता पाटील

       शैक्षणिक दृष्टीकोन व सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या से.हि.मि.ए.सो. संचालित, बालक मंदिर इ. ५वी. ते ७वी विभागवार वर्गरचना करण्यात आली . अपेक्षित असलेला सर्वांगीण विकास व्हावा हा उद्देशसमोर ठेवून शिक्षकांमध्ये जिद्दीने चिकाटीने काम करण्याची ताकद निर्माण करून त्यांच्या सहकार्याने विद्यार्थ्यांची उज्ज्वल पिढी घडवण्याचा प्रयत्न केला जातो.

         शाळेमध्ये केवल पुस्तकी ज्ञान न देता संगीत,चित्रकला, नृत्य, हस्तकला,योगासन, व व्यक्तिमत्त्व विकास यासाठी सहशालेय कार्यक्रम घेऊन जीवनशिक्षण देण्याचा प्रयत्न केला जातो . विद्यार्थ्यांच्या क्षमतेनुसार विकास घडवताना चारित्र्यसंपन्न ,सद्वर्तनी, आत्मनिर्भर, कार्यकुशल, सामाजिक बांधिलकी जपणारा विद्यार्थी उभा राहणे आवश्यक आहे. हे भारतीय मुल्ये विद्यार्थ्यांमध्ये रुजवण्याचा हेतू व श्रद्धा आहे.

                ज्ञान , उपक्रम ,वर्तन , शिस्त , नियम या सर्वांचा मिलाफ साधून शाळेतील विद्यार्थी उत्तम जीवन जगण्यास तयार करण्याचा वसा घेऊन सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी सर्वतोपरी प्रयत्न करतात . आमचे ध्येय साध्य करण्यासाठी सर्वात मोलाचे मार्गदर्शन मिळते ते संस्थेतील सर्व पदाधिकाऱ्यांचे. आमच्या प्रयत्नांना आपल्या शुभेच्छांची किनार लाभावी ही इच्छा! धन्यवाद!